व्याख्या….. मेंदूला खुराक 1 🎷


Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

व्याख्या…… मेंदूला खुराक 1 🎷


आपल्या विज्ञान विषयक What’s App समूहात सामील होण्यासाठी खालील 👇 🔗 लिंक ला स्पर्श करा 🙏

WhatsApp Group

Join Now


 निव्वळ पाठांतर किंवा समजून घेऊन केलेले पाठांतर यात फरक पडतो. समजून घेऊन पाठांतर केल्यास तो अभ्यास ठरतो.आज आपण व्याख्या पाहणार आहोत. व्याख्या सराव व पाठांतराचा भाग असतात. आकृती, समीकरणे व वर्णन यावरून माहिती समजून घेऊन अभ्यास केला तर … व्याख्या कायम स्मरणात राहतात.

प्रकाश संश्लेषण:-

कार्बन डाय ऑक्साईड आणि पाणी यांच्यात सूर्यप्रकाश व हरितद्रव्य यांच्या मार्फत रासायनिक अभिक्रिया होऊन ग्लुकोज तयार होऊन ऑक्सिजन मुक्त होण्याच्या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात.

उत्प्रेरक:- ज्या पदार्थाच्या केवळ अल्प उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो पण त्या पदार्थात 

आदिमूळ:- बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ म्हणतात.

पर्णपत्र:- पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात.

पर्णाग्र:- पानाच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणतात.

परागीभवन (Pollination) : परागकण कुक्षीवर जाऊन पडण्याच्या क्रियेला ‘परागीभवन’ म्हणतात.

फलन (Fertilization) : अंडाशयातील बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होण्याच्या क्रियेला ‘फलन’ म्हणतात.

 आदिमूळ (Radicle): बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणारा भाग म्हणजे आदिमूळ. 

 अंकुर (Plumule): बी पासून जमिनीच्या वर वाढणारा भाग म्हणजे अंकुर.  

मूळ (Root): जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या अवयवाला मूळ म्हणतात.

सोटमूळ (Tap Root): जमिनीलगत जाडसर व पुढे निमुळते व टोकदार होणारे मूळ म्हणजे सोटमूळ. 

मूलरोम (Root Hair) : मूलरोम म्हणजे मुळांच्या टोकांच्या भागांवर असणारे केसासारखे धागे.

मूलटोपी (Root Cap) : मुळाच्या टोकाच्या भागात वाढ होत असते. या मुळाच्या टोकाला संरक्षित करण्यासाठी जे आवरण असते त्यास ‘मूलटोपी ‘ म्हणतात.

पेर:- खोडावरच्या ज्या ठिकाणाहून पाने फुटतात, त्याला पेर (Node) म्हणतात. 

कांडे:- दोन क्रमवार पेरांतील अंतराला कांडे (Internode) म्हणतात.

मुकुल:- खोडाच्या अग्रभागाला मुकुल (Bud) असे म्हणतात.

पर्णधारा (Leaf Margin): पर्णपत्राची जी  कडा असते त्यास पर्णधारा म्हणतात. 

पर्णाग्र (Leaf Apex): पर्णपत्राचे पुढचे जे टोक असते त्यास पर्णाग्र म्हणतात.

पर्णतल (Leaf Base):- पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला जो भाग असतो त्यास पर्णतल म्हणतात.

उपपर्ण (Stipules):- पानांच्या पर्णतलापाशी असणारा जो छोटासा पानासारखा भाग असतो त्यास उपपर्ण म्हणतात.

 साधे पान:– ज्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते त्यास साधे पान म्हणतात.

संयुक्त पान:- ज्या पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये (Leafle विभागलेले असते त्यास संयुक्त पान म्हणतात.

 जाळीदार शिराविन्यास (Reticulate Venation):- ज्या पर्णपत्राच्या मध्यभागी एक जाड शीर (Vein) असल्यामुळे मुख्य पर्णपत्र दोन भागांत विभागल्यासारखे दिसते व या मुख्य शिरेस उपशिरा फुटलेल्या असल्यामुळे त्यांचे जाळे तयार होते त्यास जाळीदार शिराविन्यास म्हणतात.  

समांतर शिराविन्यास (Parallel Venation) :- ज्या पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या सुरुवातीपासून ते थेट टोकापर्यंत एकमेकांस समांतर असतात त्यास समांतर शिराविन्यास म्हणतात. 

 परागीभवन (Pollination) : परागकण कुक्षीवर जाऊन पडण्याच्या क्रियेला ‘परागीभवन’ म्हणतात. 

फलन (Fertilization) : अंडाशयातील बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होण्याच्या क्रियेला ‘फलन’ म्हणतात. 

विद्राव्य :- जो पदार्थ पूर्णतः विरघळू शकतो त्याला विद्राव्य म्हणतात. 

द्राव्य:- जो पदार्थ विरघळतो, त्याला द्राव्य म्हणतात.

द्रावक:- ज्या पदार्थात द्राव्य विरघळते, त्याला द्रावक म्हणतात.

द्रावण:- द्राव्य हे द्रावकात जेव्हा संपूर्णपणे मिसळते, तेव्हा द्रावण तयार होते.

वातावरणीय दाब:- हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात.

प्रकाशाचे विकिरण:- प्रकाश किरणांचे सर्व दिशांना विखुरणे म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय.

वैश्विक द्रावक:- पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात, म्हणून त्याला वैश्विक द्रावक म्हणतात.

कुपोषण:- आहारातून सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळाली नाहीत, तर होणाऱ्या स्थितीला कुपोषण असे म्हणतात.

पोषण:- पोषक द्रव्य शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात.

अन्नपदार्थ:- ज्या पदार्थांचे पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्नपदार्थ म्हणतात.

बृहत् पोषकद्रव्य:- ज्या पोषकद्रव्यांची आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते त्यांना बृहत् पोषक द्रव्य म्हणतात.(कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ)

सूक्ष्म पोषकद्रव्ये:-  ज्या पोषकद्रव्यांची आपल्या शरीराला अल्प प्रमाणात आवश्यकता असते त्यांना सूक्ष्म पोषक द्रव्य म्हणतात.(खनिजे, क्षार व जीवनसत्वे)

स्वयंपोषी:- जे सजीव प्रकाश संश्लेषण क्रियेतून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात.

परपोशी:- जे सजीव अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतात त्यांना परपोषी म्हणतात.

सहजीवी पोषण:-  सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी साध्य करण्यासाठी जेव्हा दोन किंवा अधिक सजीव एकत्र येतात तेव्हा त्याला सहजीवी पोषण असे म्हणतात. 

अन्नग्रहण:- मुखावाटे अन्न शरीरात घेण्याचे क्येला अन्नग्रहण म्हणतात

पचन:- अन्नाचे साध्या विद्राव्य घटकात रूपांतर होण्याच्या क्रियेला पचन असे म्हणतात.

सात्मीकरण:- शरीरातील पेशी व ऊतीमध्ये अन्न घटकांचे वहन व पेशीतील तंतुकनिकेत ऊर्जा निर्मिती होण्याच्या क्रियेला सात्मीकरण  म्हणतात.

उत्सर्जन:- न पचलेले आणि न शोषलेले अन्नघटक गुदद्वारावाटे शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात.



       *हे सगळं येथेच राहणार आहे, 

तुमच्या असण्याने व 

नसण्याने या विश्वाला 

काहीच फरक पडत नाही.*

         *तुम्ही याचे मालक नसून

 तात्पुरते वाहक आहात

 याचं भान ठेवलं तर

 आयुष्य सोपं आहे…!!!*

  *आपला दिवस आनंदी जावो.*🎷