दहावी व बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर🎷
विज्ञान विषयक माहितीसाठी खालील What’s App समूहात सामील व्हावे 🙏
बोर्डाकडून 2025 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांच्या तारखा जाहीर.
बोर्डाकडून परीक्षेच्या आयोजनात खूप मोठा बदल करण्यात आला आहे.
2025 मध्ये होणारी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा ही कमीत कमी दोन आठवडे लवकर होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करून पुढील प्लॅनिंग करण्यासाठी पुढील तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर पुढे चालून जाहीर करण्यात येणार आहे.
🎉 कारण :-
1. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे.
2. पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करणे.
3. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी लवकर करणे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. दरवर्षी 12 बोर्ड परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेतल्या जातात. तर 10 वी बोर्ड परीक्षा ही मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते.
🎻10 वी म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या तारखा
🎻 अंतर्गत मूल्यमापन:-
विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा, इतर विषयांच्या तोंडी परीक्षा, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा
03/02/2025 ते
20/02/ 2025
*******
लेखी परीक्षा:–
21/ 02/2025 वार शुक्रवार
ते 17/03/2025 वार सोमवार .
@@@@@
🕛 12 वी म्हणजे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा वेळापत्रक.
1. अंतर्गत मूल्यमापन
24/01/2025 ते
10 /02/2025
++++++
2. लेखी परीक्षा
11/02/2025 ते
18/03/2025
🌼 सध्या दिलेल्या या वेळापत्रकाचा फायदा असा होणार आहे की शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करता येईल.
🔥 परीक्षेच्या तारखा व नियोजनाबाबत काही हरकती असल्यास 23 ऑगस्टपर्यंत 2024 पर्यंत मंडळाच्या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी असे मंडळाने जाहीर केले आहे.
—–+++—–
*दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसं तोडू नका;
कारण काडी टाकून आग लावणे,
आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे.
लक्षात ठेवा एकदा नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला खूप वेळ जातो
कदाचित संपूर्ण आयुष्य.*
आपला दिवस आनंदात जावो 🎷