शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 🎷

 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

मिडलस्कूल स्कॉलरशिप

यात यश म्हणजे बाल वयात ज्याला नियोजन जमले तो जिंकला.
यश = वेळेचे नियोजन 

इयत्ता पाचवीच्या बऱ्याच चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रथम स्पर्धा परीक्षा आहे.(कारण ओलंपियाड परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षा बाकी मुले देतात म्हणून) जास्त काही समजायच्या आतच आधुनिक जगाशी जुळून घेण्यासाठी स्पर्धेच्या जलतरणास सुरुवात करायची आहे.

इयत्ता पाचवी साठी जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्या परीक्षेत मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा समावेश आहे.

 या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांशी शिक्षकांचे असे वर्तन असावे की विद्यार्थ्यांना असे वाटलेच नाही पाहिजे की ते एका विशिष्ट परीक्षेची तयारी करत आहेत . मुलांकडून आवश्यक असलेल्या प्रश्नांचा सराव याच क्रियेतून करून घ्यावा.OMR पद्धतीनुसार जर कोऱ्या उत्तर पत्रिका मुलांना दिल्या तर मुले त्यावर सराव करतील.

बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा अभ्यास करत असताना शिक्षकांनी जे समजून सांगितले आहे त्याप्रमाणे प्रथम प्रश्नांचा सराव करावा. त्यानंतर हळूहळू अभ्यास वाढत गेल्यावर स्पष्टीकरणासह प्रश्नाचे उत्तर जर आपण अभ्यासण्याचा सराव केला तर हा विषय सोपा जातो. यासाठी ज्यांना जमेल त्या विद्यार्थ्यांनी तो प्रश्न आपल्या सहकारी मित्रांना समजून सांगितल्यास अभ्यास लवकर होतो. 

अभ्यासक्रम:- कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रथम अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्यावा. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेतल्यास अभ्यास कसा करावा हे समजते. 

कोणत्याही परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर त्या अभ्यासक्रमाची योग्य पुस्तक आपल्याजवळ असणे गरजेचे आहे. 

सुट्टीचा दिवस किंवा रविवार हा Revision / पुनरावृत्ती साठी महत्त्वाचा असतो.

पूर्वतयारी:- परीक्षेसाठी आवश्यक असलेले पुस्तक जर घरी असेल तर जो पाठ शिक्षक शिकवणार आहेत तो वाचून गेल्यास आपणास लवकर समजतो.

काही अभ्यासक्रम हा आपल्याला लवकर समजतो तर काही उशिरा. 

जो अभ्यासक्रम लवकर समजतो तो करून ठेवावा. जो अभ्यास लवकर समजत नाही त्याचा सराव वाढवावा. 

प्रत्येक विषयात काहीतरी असे असते जे आपणास लवकर समजते त्यातील गुण आपण प्रथम संपादित करावेत. 

ज्या विषयाच्या धड्याचा अभ्यास झाला आहे त्या धड्यावर एक प्रश्नपत्रिका सोडवल्यास अभ्यासा परिपूर्ण होतो, या नियमाचे काटेकोरपणे पालन केलेस यशाच्या आपण जवळ जातो.

 इयत्ता पाचवी साठी प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असतो. 

शिक्षकांनी मुलांचा अभ्यास घेताना काठिन्य पातळीचा विचार अवश्य करावा सोप्याकडून कठीणाकडे हा क्रम ठेवला तर विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाची गोडी निर्माण होईल. अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी जे काही आपल्याकडून सकारात्मक प्रयत्न करता येतील ते सर्व शिक्षकांनी व पालकांनी मिळून केल्यास यश नक्कीच मिळते. या ठिकाणी पालकांच्या केलेल्या प्रयत्नाला पण अन्यन्य महत्त्व आहे.

इयत्ता पाचवी 

पेपर 1

गणित – 100 गुण

मराठी भाषा – 50 गुण

✍️ मराठी प्रथम भाषा – 

प्रश्न संख्या-  25

 गुण –  50 

🟰 गणित 

प्रश्न संख्या –  50 

गुण–  100

1️⃣ पेपर 1

एकूण प्रश्न संख्या– 75 

गुण– 150

वेळ 90 मिनिटे  (1 तास 30 मिनिटे)

2️⃣ पेपर 2 

बुद्धिमत्ता चाचणी – गुण 100

इंग्रजी तृतीय भाषा-  गुण 50 

बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न संख्या-  50

 गुण – 100

इंग्रजी तृतीय भाषा प्रश्न संख्या-  25 

गुण–  50 

एकूण प्रश्न संख्या–  75 

गुण–  150 

पेपर 2 साठी 

वेळ –  90 मिनिटे (1 तास 30 मिनिटे)

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30 % येतात. 

मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% 

कठीण स्वरूपाचे प्रश्न 30 %


📋 उत्तर पत्रिका कशी असते?

पेपर 1 व पेपर 2 साठी OMR पद्धतीनुसार चार वर्तुळे 1, 2, 3, 4 आहेत. विद्यार्थ्यांनी योग्य उत्तराच्या पर्यायी वर्तुळास निळ्या किंवा काळ्या रंगाच्या शाईच्या बॉलपेनने रंगवावे.

 


🥁 बौद्धिक क्षमता कसोटी हा पेपर मुलांची खरी बुद्धिमत्ता तपासणारा आहे. या प्रश्नाचे सराव करताना एक तर मुलं बौद्धिक दमतात किंवा त्यांना हे कंटाळवाणे वाटते. यातून मार्ग काढणे यासाठी एकच सूत्र म्हणजे सराव.

 बौद्धिक क्षमता कसोटी यात विचारलेले काही प्रश्नांची काठीण्य पातळी खूपच कठीण असते. त्यामुळे त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी लागणाऱ्या वेळ जास्तीचा ठरतो. अशा वेळेस जे सोपे प्रश्न आहेत त्या प्रश्नामधून वाचलेला वेळ या प्रश्नांसाठी आपल्याला देता येईल. यासाठी सोप्या प्रश्नांची तयारी एवढी जास्त असावी अल्पकाळात ते उत्तर रंगवलेले असावे. 

कठीण गोष्टीला सोपे करण्यासाठी एकच सूत्र सराव सराव सराव.

🥁 काही महत्त्वाच्या सूचना

  • दिलेल्या सर्व सूचना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • उत्तरपत्रिकेवर व प्रश्नपत्रिकेवर स्वतःचा केंद्र क्रमांक, परीक्षा क्रमांक दिलेल्या जागी सुवाच्यपणे लिहा. 
  • खाडा खोड करू नये.
  •  प्रश्नपत्रिकेचा काही भाग कच्च्या कामासाठी राखून ठेवलेला असतो. तेथेच कच्चे काम करावे.
  •  प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहू नये किंवा कोणत्याही खुणा करू नये. 
  •  प्रत्येक प्रश्नाला चार पर्यायी उत्तरे दिलेली असतात. त्यातील सर्वांत अचूक पर्याय निवडून त्या पर्यायाचा गोल पुर्ण भरावा.

  • अयोग्य पद्धतीने रंगवलेली उत्तरे ग्राह्य धरली जात नाही त्यामुळे गुण कमी होतात.
  • उत्तरपत्रिका OMR पद्धतीने तपासली जाणार असल्यामुळे एका प्रश्नाकरिता केवळ एकच पर्यायाची निवड करून त्याचे वर्तुळ काळ्या किंवा निळ्या पेनने रंगविणे आवश्यक आहे. किंवा उत्तर रंगवण्यासाठी जी सूचना दिली त्याप्रमाणे वागणे.

🐢 अभ्यासाविषयी अजून थोडे 😄:-

  1. प्रथम धडा लक्षपूर्वक वाचावा.
  2. त्या धड्यावर आधारित प्रश्न वाचावेत.
  3. योग्य उत्तरांचा अंदाज करावा.
  4. सराव करणे म्हणजे त्या घटकावर आधारित अधिकचे प्रश्न सोडवणे.
  5. प्रत्येक पाठाच्या सुरुवातीस दिलेल्या मार्गदर्शक मुद्द्यांचे वाचन व चिंतन करावे.
  6.  नमुना प्रश्न व त्यासाठी स्पष्टीकरणे यांचा चिकित्सक अभ्यास करावा.
  7. प्रश्नांचे वाचन व अचूक संभाव्य उत्तराचा शोध घ्यावा.
  8. स्पष्टीकरणावर सखोल विचार करावा. 
  9. प्रश्नाच्या स्पष्टीकरणाचे वाचन करावे.
☝️आता आणखीन एका मूळ मुद्द्याकडे वळवू 🥁
दिवसातील उपलब्ध वेळ 24 तास
झोप:- पाचवीची मुलं असल्यामुळे 8 ते 9 तास झोप गरजेचीच.
खेळ : 30 मिनिट 
दररोजच्या मूलभूत क्रिया करणे:- 1 तास 
शाळेचा कालावधी:– 6 तास (अंदाजे प्रवासासह).
बऱ्याच मुलांना ट्युशन असते :- 3 तास
दररोज अभ्यास केल्यास शाळेचा व ट्युशन चा अभ्यास यासाठी 1 तास 30  मिनिटे. 

24 – 9 – 0.5 – 1 – 6 – 3 – 1:30 = 3 तास 

म्हणजे आपल्याजवळ फक्त तीन तास आहेत. त्यामुळे या तीन तासांचे काटेकोर नियोजन गरजेचे आहे. 

गणित : 40 मिनिट ( 5 मिनित विश्रांती )

मराठी : 30 मिनिट. ( 5 मिनित विश्रांती )

बुद्धिमत्ता : 40 मिनिट  ( 5 मिनित विश्रांती )

इंग्रजी : 30 मिनिट 

रात्र थोडी सोंगे फार या म्हणीप्रमाणे कार्य करावे लागणार आहे. यासाठी चौथीची परीक्षा झाल्यावरच स्कॉलरशिप परीक्षेचे नियोजन सुरू केल्यास मुलांना ताण न येता हसत खेळत शिक्षण होईल.

शाळा सुटली, पाटी फुटली

आई, मला भूक लागली😄

तरीपण प्रथम पालकांना  व मुलांना नंतर शुभेच्छा.


*डोळे जगातली प्रत्येक वस्तू बघू शकतात. परंतु डोळ्यांच्या आत काही गेलं तर ते बघू शकत नाहीत. त्याचप्रमाणे माणूस दुसऱ्याचे दोष तर बघू शकतो. परंतु स्वतःमध्ये* *असणारे दोष तो बघू शकत नाही.*


 आपला दिवस आनंदात जावो 🎷